सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर…

धाराशिव दि ७ — सोयाबीन या खरीप हंगामातील पिकाच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संशोधनातून तयार करण्यात आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धाराशिव तालुक्यातील उपळा या गावातील २० शेतकऱ्यांच्या शेतात कार्यान्वित करण्यात आले आहे. यात स्वयंचलित हवामान केंद्र आधारित दहा शेतकऱ्यांच्या शेतात तर सेंसर आधारित दहा शेतकऱ्यांच्या शेतात या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.
या तंत्रज्ञानाच्या आधारे उपळा गावात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. (VO)या हवामान केंद्राच्या परिघांमध्ये असलेल्या साधारण वीस किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांना दररोज पडणारा पाऊस, वातावरणातील आर्द्रता, उष्णता तसेच वातावरणातील बदल यांची निरीक्षणे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ॲपद्वारे मोबाईल संदेशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर पडणारे विविध रोग किडींचा प्रादुर्भाव याची माहिती मिळणे सोपं झालं आहे त्यामुळे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपायोजना औषध फवारणी याची तात्काळ माहिती मिळत आहे.तसंच सोयाबीनवर पडणाऱ्या विविध कीड रोगांच्या प्रादुर्भावासाठी ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे प्रत्यक्ष काही शेतकऱ्यांना दाखवल जात आहे.
जमिनीतली आर्द्रता जमिनीतला ओलावा वातावरणातील बदल आणि त्यानुसार पिकांना आवश्यक पाण्याची मात्रा याची माहिती देखील या संदेशाद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर त्यांना मिळू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावं लागत नाही तसेच त्या ॲप मधून विशिष्ट वेळेत सोयाबीनच्या क्षेत्राला लागणारं पाणी आणि त्यानुसार कृषी पंपाची वेळ निर्धारित करून टायमर लावल्यास तेवढ्या वेळानंतर पाणी ऑटोमॅटिक बंद होण्याची यंत्रणा देखील यात आहे.
या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असून हवामान आणि जमिनीची स्थिती याचा अभ्यास करून सोयाबीन पिकावर पडणाऱ्या कीड रोगांचे व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याला मदत होणार असून त्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ होईल यासाठी लागणारे पाणी यात देखील 25 ते 30 टक्के बचत होईल असं या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉक्टर सुनील कदम ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार विकसित राष्ट्र विकसित कृषी संकल्प या अभियानांतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचं ठरवलं असून त्याचाच हा प्रायोगिक तत्त्वावरील देशातला सोयाबीन पिकासाठीचा पहिला प्रयोग असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. ML/ML/MS