पावसाने उसंत दिल्याने सोयाबीन सोंगणीला वेग…

वाशीम दि १ : गत दोन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला वेग आणला आहे. शेतकरी हातमजुरीसोबतच क्रशरच्या साहाय्यानेही काढणीचे काम करत आहेत. सोबतच मजुरांची उणीव लक्षात घेता अनेक शेत मालकांनी शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील मजूर खाजगी कंत्राटदारामार्फत वाशीम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरासरी एकरी सहा ते आठ क्विंटल उत्पादन मिळणारे सोयाबीन यंदा केवळ दोन ते तीन क्विंटल आले आहे. या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून उत्पादन खर्चसुद्धा वसूल होणे कठीण झाले आहे.ML/ML/MS