केंद्र सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड योजना

 केंद्र सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड योजना

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने सॉवरेन Sovereign Gold Bond Scheme (SGB) बंद केली आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती वाढल्यामुळे सरकारला ही योजना सुरू ठेवणे कठीण झाले होते. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस २,८०० रुपयांच्या पुढे गेला आहे. भारतातही सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८४,९०० रुपयांवर पोहोचला होता. यामागील कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता पाहता सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Sovereign Gold Bond Scheme बंद झाल्यानंतर आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड हा एकमेव पर्याय उरला आहे. या दोन्हीमधील गुंतवणूक गरज पडल्यास तुम्ही सहजपणे विकू शकता. या दोन पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे भौतिक सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा सोपे आहे. कारण यामध्ये तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *