पुण्यात उभा राहणार द. आशियातील सर्वात मोठा e- Cycle कारखाना

 पुण्यात उभा राहणार द. आशियातील सर्वात मोठा e- Cycle कारखाना

पुणे, दि. ९ (एमएसी न्यूज नेटवर्क) : देशात ई-सायकलचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. इंधनाचे दर, पर्यावरणाचे प्रश्न यांवर उपाय ठरणाऱ्या ई-सायकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. पुणे येथे द. आशियातील सर्वांत मोठा ई-सायकल निर्मिती कारखाना उभारण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रावेत, पुणे येथे ईमोटोराड EMotorad या कंपनीचा 2 लाख 40हजार चौरस मीटर क्षेत्रावर हा कारखाना उभारला जात आहे. याचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल आणि 15 ऑगस्टपासून उत्पादन सुरू होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अथे वार्षिक 5 लाखांहून अधिक सायकल्सचे उत्पादन होऊ शकेल.

कंपनीच्या या गिगाफॅक्टरीमध्ये, बॅटरी, मोटर्स, डिस्प्ले आणि चार्जरसह इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व घटकांचे उत्पादन केले जाईल. नवीन उत्पादन सुविधेसह कंपनी आपली उत्पादन श्रेणी वाढवण्याच्या तयारीत आहे. नवीन सुविधेसह कंपनी आपली उत्पादन श्रेणी देखील वाढवेल. यामध्ये नवीन इलेक्ट्रिक सायकलचाही समावेश असेल. या फर्ममध्ये क्षमता वाढवण्यासाठी कंपनी 300 नवीन लोकांना कामावर घेणार आहे. सध्या या कारखान्यात 250 लोक काम करत आहेत.

चार टप्प्यात उत्पादन सुविधा पूर्ण केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. सर्व चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर, एकाच ठिकाणी बांधण्यात आलेला हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा कारखाना असेल. नाविन्यपूर्ण उत्पादने बनवण्याबरोबरच, कंपनी जुन्या उत्पादनांमध्ये आवश्यक बदल करून नवीन उत्पादन देखील लाँच करेल. कंपनी 4.0 मानकांवर देखील लक्ष केंद्रित करत आहे

ML/ML/SL

9 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *