सोमठाणा धरणात पाण्याची मोठी आवक, आतापर्यंत 72.66 टक्के भरले…

जालना दि १८ :– मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सध्या धरण 72.66 टक्के भरले असून, ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहे. बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील नदी, नाले, ओढे आणि साठवण तलावांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला आहे. सोमठाणा धरणातून तालुक्यातील जवळपास अर्ध्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेतकरी आपल्या फळबागा आणि शेतीसाठी याच पाण्याचा वापर करतात. बदनापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमठाणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. सध्या धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी अवघे दोन फूट बाकी असून, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.ML/ML/MS