राज्यातील शेतकऱ्यांना पुढील वर्षी सलग आठ तास दिवसा वीजपुरवठा

 राज्यातील शेतकऱ्यांना पुढील वर्षी सलग आठ तास दिवसा वीजपुरवठा

मुंबई दि १० : राज्यात मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेच्या माध्यमातून सध्या चार हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे त्याचा लाभ आठ लाख शेतकऱ्यांना होत आहे, पुढील वर्षी आणखी दहा हजार मेगावॉट सौर ऊर्जा उपलब्ध होणार असून त्यातून बहुतांश सर्व शेतकऱ्यांना किमान आठ तास सलग दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आपली ही योजना केंद्र सरकारने इतर राज्यांनीही लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं ते म्हणाले.

दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांच्या संकलन केंद्रांसाठी वीज दर कमी करण्यासाठी सरकारने केलेली विनंती राज्य वीज नियामक आयोगाने मान्य केली असून ते दर आता एक जुलै पासून लागू होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली याबाबत चा मूळ प्रश्न अनिल पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर नाना पटोले यांनी उपप्रश्न विचारला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *