दिवाळीपूर्वी सुरु होणार सोलापूर- मुंबई विमानसेवा

सोलापूर, दि. 19 : सोलापूर – मुंबई विमान सेवेला अखरे मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. सोलापूर विमानतळावरुन मुंबईसाठी विमान कधी उडणार याबद्दल अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती.
सोलापूर – मुंबई विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासोबत सोलापूर – बंगळुरू विमान सेवादेखील सुरु होणार आहे. दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी सांगितलं की, 15 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर – मुंबई, सोलापूर बंगळुरु विमानसेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबरपासून दुपारी 12:55 मिनिटांनी सोलापूर- मुंबई आणि दुपारी 02:45 मिनिटांनी मुंबई- सोलापूर विमान आकाशात भरारी घेणार आहे.
उड्डाण वेळापत्रक
सोलापूर-मुंबई – प्रस्थान : दु. 12:55 वा.
मुंबई-सोलापूर – प्रस्थान : दुपारी 2:45 वा.
बंगळुरू-सोलापूर – प्रस्थान : सकाळी 11:10 वा.
सोलापूर-बंगळुरू – प्रस्थान : दुपारी 4:15 वा.
सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही शहरातल्या विमानसेवेच्या प्री- तिकिट बुकिंगसाठी ही 20 सप्टेंबरपासून करता येणार आहे. सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. या विमानसेवा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय.