खेळातून व्यवस्थापनाचे धडे देणारे सॉफ्टवेअर – IIT मुंबईचे संशोधन
 
					
    मुंबई, दि. २८ : IIT मुंबईच्या टेक्नोक्राफ्ट सेंटर फॉर अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (टीसीए२आय) या केंद्रातील संशोधकांनी ‘एमएसगेम्स’ हे अनोखे सॉफ्टवेअर तयार केले आहे. एमएसगेम्स’ या सॉफ्टवेअरद्वारे व्यवस्थापन शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभव, अनुकूलता आणि खेळाच्या माध्यमातून शिकण्याचा नवा आयाम प्राप्त झाला. हे सॉफ्टवेअर सध्या देश-विदेशातील ५० पेक्षा अधिक प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये वापरले जात आहे.
IIT मुंबईतील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये १० पेक्षा जास्त इंटरॅक्टिव्ह सिम्युलेशन्स समाविष्ट असून, त्यामधून ऑपरेशन्स मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, ऑर्गनायझेशनल बिहेविअर आणि इकॉनॉमिक्स अशा विषयांवरील कौशल्यांचा विकास साधता येतो.
उपक्रमामागे टेक्नोक्राफ्ट समूहाचे संस्थापक आणि आयआयटी मुंबईचे ‘डिस्टिंग्विश्ड अल्युम्नस अवॉर्ड’ प्राप्त डॉ. शरद सराफ आणि त्यांचे बंधू सुदर्शन सराफ यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या पाठबळामुळे टीसीए२आय हे केंद्र देशातील अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाचे प्रमुख हब म्हणून विकसित झाले आहे.
SL/ML/SL
 
                             
                                     
                                    