सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे भारतीय महिला आळशी, WHO चा अहवाल, पुरूषांचे प्रमाण कमी
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या सोशल मिडियाचा वापर खूप वाढला आहे. अनेक गोष्टी यामुळे शक्य झाल्या आहेत. ऑनलाईन कामे करणे सोपे झाले आहे. मात्र इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर रील, व्हिडिओ पाहण्यात अनेकजण आपला खूप वेळ घालवतात. यात महिलांचे प्रमाण जास्त असल्याचं आणि त्यामुळे त्या आळशी झाल्याचं एका संशोधनात म्हटलं आहे. यात पुरूषांचे प्रमाण कमी आहे. WHOने हा अहवाल दिला आहे. WHO ने महिलांसाठी एक आरोग्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, महिला सोशल मीडिया साईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे महिला जास्त प्रमाणात आळशी आहेत. या सर्व कारणांमुळे महिलांच्या आरोग्यात खूप काही बदल होणार आहेत. WHO च्या अहवालानुसार, देशभरात 57 टक्के भारतीय महिला पुरुषांपेक्षा आळशी आहेत
TR/ML/PGB
1 Oct 2024