संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात सामाजिक समता उत्सव

सोलापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांस्कृतिक कार्य विभाग आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक समता उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंढरपूरच्या प्रदर्शना मार्गावर सुमारे 100 दिंड्यांनी संत चोखामेळा यांच्या अभंगाचे गायन करत प्रबोधन केले.Social equality festival in Pandharpur on the occasion of Saint Chokhamela’s death anniversary
स्वर्गात नासलेले अमृत शुद्ध केलेल्या संत चोखामेळा यांच्या घरी साक्षात विठ्ठलाने दहीभाताचा नैवेद्य खाल्ला होता. याची आठवण म्हणून सुमारे १० हजार भाविकांना दहीभाताचे वाटप करण्यात आले. यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, ह.भ. प. विठ्ठल पाटील , पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी वारकरी भक्तांचे प्रबोधन करत संत चोखामेळा यांची माहिती दिली.
तेराव्या शतकात संत चोखामेळा यांनी केलेले समतेचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. असे गौरवोद्गार वारकरी साहित्य परिषदेच्या विठ्ठल पाटील यांनी काढले.
ML/KA/PGB
18 May 2023