तर दीव; दमणचा नगर हवेलीत रिपब्लिकन पक्षाचा खासदार निवडून येईल

 तर दीव; दमणचा नगर हवेलीत रिपब्लिकन पक्षाचा खासदार निवडून येईल

सिल्व्हासा प्रतिनिधी ~ दीव दमण आणि दादरा नगर हवेली हा केंद्र शासित प्रदेश असून येथे दोन लोकसभा मतदार संघ आहेत.महाराष्ट्र आणि गुजरात लगत असणारा हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत बनवावे.जनतेची कामे करून जनतेचा विश्वास संपादन करावा.सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत केल्यास पुढील लोकसभा निवडणुकीत येथून रिपब्लिकन पक्षाचा खासदार निश्चित निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

सिल्व्हासा येथील काल केंद्रात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले उपस्थित होत्या.अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे दीव दमण दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशचे अध्यक्ष विनोद जेठवा ; रिपाइं चे गुजरात चे प्रदेश अध्यक्ष अशोककुमार भट्टी; गुजरात चे प्रभारी जतीन भट्टी; सुरेश बार्शिंग ;शैलेशभाई शुक्ला;राजकुमार टाक ; लीलावतीबेन वाघेला; राजेश गोयल; संदीप प्रजापती; वंदना सिंग; प्रियांक पटेल; सुदर्शन कांबळे; जितभाई बरिया; प्रशांत कापडी; महेन्द्र राजपुरोहित; हरीश सिंग; राजेंद्र चौधरी; नाना पवार; हितेश कश्यप; उपस्थित होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या दादरा नगर हवेली div दमण च्या कार्याध्यक्षपदी दीप शाह या लोकप्रिय तरुण कार्यकर्त्याची निवड करण्यात आल्याचे आणि दीव दमण दादरा नगर हवेली च्या प्रभारी पदी जतीन भुट्टा यांची निवड करण्यात आल्याचे ना.रामदास आठवले यावेळी जाहीर केले.

दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे लोकसभेचे छोटे मतदार संघ आहेत.या भागात दलित आदिवासी ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत.या भागात उद्योग आणि पर्यटन वाढत आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित समाजात जन्माला आले असले तरी त्यांनी सर्व जाती धर्मियांसाठी देशासाठी आणि अखिल मानवजाती sthi काम केले आहे.त्यांनी देशाला दिलेले संविधान सर्व जाती धर्मीयांसाठी देशाच्या उत्थानासाठी दिलेली अनमोल देणगी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मियांना घेऊन निवडणुका जिंकण्यात.आगामी लोकसभा निवडणुकीत दीव दमण आणि दादरा नगर हवेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचा खासदार पुढील निवडणुकीत निवडून येईल यासाठी आज पासून कामाला लागावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *