सापाच्या विषाची तस्करी करणारा एल्विश यादव पोलिसांच्या ताब्यात

कोटा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता आणि युट्युबर एल्विश यादव याला अटक झाली. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष देखील जप्त करण्यात आले आहे. यावेळी चौकशी दरम्यान त्यांनी एल्विश यादव याचे नाव घेतले आहे. सदरचे जप्त विष एल्विश यादवच्या पार्टीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी एल्विशला अटक केल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एल्विश यादवला कोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नोएडा पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. यावेळी पोलिसांनी तो गुन्हेगार नसल्याचे सांगत त्याला अटक करण्यास नकार दिला. यानंतर एल्विश यादवची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एल्विशला राजस्थामधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला कोटा-झालावार हायवेर ताब्यात घेतले.कोटा ग्रामीणमधील पोलीस निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करत तपासणी करत होते. त्यावेळी एल्विशची कार त्यांना दिसली. जवळपास २० मिनिटे पोलिसांनी त्याची चौकशी केली. मुंबईहून दिल्ली याठिकाणी मित्रांसोबत जात असल्याची माहिती त्याने दिली. तसेच पोलिसांनी सर्व कागदपत्रांची चौकशी केली आणि त्याला सोडून दिले.
SL/KA/SL
5 Nov. 2023