रस्त्यावर झाला शंखी गोगल गायींचा सुळसुळाट…
वाशीम दि ४ : वाशीमच्या कारंजा शहरातील हासमानी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायी दिसून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लहान आणि मोठ्या आकाराच्या या गोगल गायी रस्त्यावर फिरताना आढळल्या. अवकाळी पावसामुळे ओलसर वातावरण तयार झाल्याने या निशाचर गोगल गायी जमिनीबाहेर आल्याचे दिसते.
या गोगलगायी रात्री सक्रिय राहतात आणि शेतातील कोवळी पिके, विशेषतः भाजीपाला आणि नाजूक पाने खाऊन मोठे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नागरिकांनी अशा गोगल गायींचा नाश करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.ML/ML/MS