या देशात Gen Z वर धुम्रपान बंदी

 या देशात Gen Z वर धुम्रपान बंदी

सरकारने तंबाखूविरोधी लढ्यात ऐतिहासिक पाऊल उचलले असून ज्या व्यक्तींचा जन्म १ जानेवारी २००७ नंतर झाला आहे, अशा सर्वांवर कायमस्वरूपी धुम्रपान बंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे मालदिव हे न्यूझीलंडनंतरचे दुसरे देश ठरले आहे, ज्यांनी तंबाखूच्या वापरावर पिढीगत बंदी घातली आहे.

मालदिवच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, या बंदीचा उद्देश म्हणजे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे आणि तंबाखूविरहित पिढी घडवणे. या कायद्यानुसार, २००७ नंतर जन्मलेली कोणतीही व्यक्ती तंबाखू खरेदी, विक्री किंवा वापर करू शकणार नाही. ही बंदी स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांवरही लागू आहे, त्यामुळे मालदिवमध्ये प्रवास करणाऱ्या तरुण पर्यटकांनाही याचे पालन करावे लागेल.

या कायद्याची अंमलबजावणी तंबाखू नियंत्रण अधिनियमात सुधारणा करून करण्यात आली असून राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे. मालदिवमध्ये तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे ही बंदी आणखी महत्त्वाची ठरते. याआधीच मालदिवने इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिराती, विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी वापरावर निर्बंध घातले होते, आणि आता Gen Z साठी कायमस्वरूपी बंदी घालून त्यांनी तंबाखूविरोधी धोरण अधिक कठोर केले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *