Air India च्या विमानात स्मार्टफोनचा स्फोट

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
विमान प्रवास करताना स्मार्ट फोन्स बंद करा,अशी सुचना दिली जाते. एवढासा स्मार्ट फोन विमान प्रवासात कशा प्रकारे धोकादायक ठरू शकतो. याचा एक प्रत्यय नुकताच आला आहे. पायलटने तत्काळ निर्णय घेतल्यामुळे सुदैवाने या घटना धोकादायक ठरलेली नाही. एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर एका पॅसेंजरच्या स्मार्टफोनचा स्फोट झाल्यानं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. विमानात धूर दिसून आल्यानं पायलटनं विमानं लँड करण्याचा निर्णय घेतला. नंतर संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर तसेच अडचण दूर केल्यानंतर पुन्हा विमानानं टेकऑफ केलं.
इमर्जन्सी लँडिंगनंतर एअर इंडियाच्या विमानानं तासाभरातच उदयपूर इथून पुन्हा उड्डाण केलं. इंडिगोच्या 6E 2134 या विमानानं दिल्लीहून डेहराडूनच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.पण विमानात काहीतरी गडबड झाल्यानंतर या विमानाचं काही वेळातच पुन्हा दिल्ली विमानतळावर लँडिंग झालं होतं. या विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानानं वॉर्निंग सिग्नल दिल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली होती.
SL/KA/SL
17 July 2023