सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ” स्मार्ट बस “

 सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ” स्मार्ट बस “

मुंबई दि १५– भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ” स्मार्ट बसेस ” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या ३ हजार बसेस खरेदी च्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर , संबंधित खाते प्रमुखां सह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन लालपरी सह येणाऱ्या सर्व बसेस मध्ये ए. आय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञान वर आधारित (anti- theft technology ) बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असून , प्रवासात बसेस मध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार असून, चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा ” तिसरा डोळा ” लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये ” पार्किंग ” मध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा बस मध्ये बसविण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

महत्वाच्या माहितीसाठी एल.ई.डी.टि.व्ही.

नवीन बसेस मध्ये लावण्यात येणाऱ्या एल.ई.डी. टीव्ही च्या माध्यमातून जाहिराती बरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडी बाबत ” अपडेट ” राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूस देखील जाहिरात प्रसिद्धी करीता एल.ई.डी पॅनल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे.

फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा

सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेस ला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून बस मध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तात्काळ विजवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा सुरक्षितते बरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणे, तसेच बस फेऱ्यांचा वक्तशीर पणा वाढवणे यासाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात खऱ्या अर्थाने एसटी ” स्मार्ट ” होईल! असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *