स्कायडायव्हरने जी २० चा झेंडा फडकावला रशियाच्या आकाशात

वाशिम, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गोभनी गावच्या हिमांशू साबळेने भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेचा झेंडा थेट रशियाच्याच्या आकाशात फडकवलाय. भारतीय स्कायडायव्हर्सच्या एका टीमने माजी सैनिक आणि प्रसिद्ध विंगसूट पायलट अजय कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १४,००० फूट उंचीवर पोहोचून
रशियामधील ढगांच्या वर G20 चा ध्वज प्रदर्शित केला.
या टीम मध्ये वाशीमच्या हिमांशू साबळे सह,
अनामिका शर्मा, ऋषिकेश गौडा यांचाही समावेश होता. त्यांनी एकत्रितपणे आकाशातून झेप घेऊन हे मिशन पूर्ण केलंय. जागतिक सहकार्य आणि मुत्सद्देगिरीसाठी भारताच्या वतीने एकता, शक्ती आणि दृढनिश्चयाचा संदेश यातून त्यांनी दिला आहे.
ML/KA/PGB 8 Sep 2023