अभिनेता सलमान खान प्रकरणात सहावी अटक

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष मोक्का न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी खंडणी वसूल करण्याचे काम हरपाल सिंह करीत होता. याप्रकरणातील ही सहावी अटक आहे.
14 एप्रिलच्या रात्री सलमाना खानच्या मु्ंबईतल्या वांद्रे इथल्य गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला.या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांसह बिहारमधल्या पश्चिम चंपारण इथून अंकित आणि आशिष या दोघांना अटक केली. आज मुंबई पोलिसांनी हरियाणा मधून हरपाल सिंह याला अटक केली आहे. Sixth arrest in actor Salman Khan case
ML/ML/PGB
14 May 2024