या सहा गावातील मतदार टाकणार महायुतीच्या उमेदवारांवर बहिष्कार

 या सहा गावातील मतदार टाकणार महायुतीच्या उमेदवारांवर बहिष्कार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या सहा गावांतील ५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची ७७५ एकर शेतजमीन सरकारच्या आद्योगिक विकासासाठी अधिग्रहित केली.
त्याबदल्यात या शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी नुकसानभरपाई व कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र ३२ वर्ष उलटून गेले तरी कंपनी कडून या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे या सहा गावातील शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ऍड. असीम सरोदे व ऍड सिद्धार्थ इंगळे यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली.
या पत्रकार परिषदेला समाजसेवक संतोष ठाकूर,टीस स्कॉलर व नितीन पगारे उपस्थित होते.
१९८९ पासून जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड आणि सरकारकडे मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या सहा गावांतील ५ हजाराहून अधिकशेतकऱ्यांची ७७५ एकर जमीन
आद्योगिक विकासासाठी अधिग्रहित केली .
त्याबदल्यात या शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी नुकसानभरपाई व कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र ३२ वर्ष उलटून गेले तरी कंपनी कडून या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने न वापरलेली जमीन परत करावी, खोटी आश्वासने दिल्यामुळे गेलेल्या ३२ वर्षाच्या उपजीविकेसाठी नुकसानभरपाई मिळावी, १९८९ आणि २००९ मध्ये केलेल्या रोजगार आणि भरपाई संबंधित करारांची त्वरित अंमलबजावणी व्हावी व जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, स्थानिक राजकारणी आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यातील संगनमताची अधिकृत चौकशी करून या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी.अशी मागणी
ऍड असीम सरोदे, व ऍड सिद्धार्थ इंगळे,
यांनी केली आहे, मागणी मान्य न झाल्यास रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या सहा गावांतील ५ हजार हून अधिक शेतकऱ्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकणार अशी माहिती ऍड असीम सरोदे व ऍड सिद्धार्थ इंगळे यांनी दिली.

PGB/ML/PGB
18 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *