डेटिंग ॲप द्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणांना फसवणाऱ्या दिल्लीतील ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये महागडी दारू व जेवणावर ताव मारून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल व्यावसायिकाशी संगनमत करून फसवणूक केली जात होती. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. शहाबाज निजाम खान (२०), स्वपन सैनी (२१), आयुष कुमार (२०), सरल सिंह (१८), राधिका सिंह (१८) व राखी सिंधी (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते सर्व दिल्लीतील रहिवासी आहेत.

आरोपी वाईल्ड या डेटिंग ॲपद्वारे तरुणांना हेरून ‘द गॉड फादर’ या हॉटेलमध्ये डेटसाठी बोलवायचे. त्यानंतर महागडी दारू व खाद्यपदार्थ मागवून ती मुलगी पळून जायची. २६ वर्षीय तरुणासोबत अशाच प्रकारे मुस्कानने संपर्क साधला होता. ३० जुलैपासून या तरुणासोबत चॅटिंग केल्यानंतर आरोपी तरुणीने त्याला ४ ऑगस्टला बांगुर नगर पोलिसांच्या हद्दीतील हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर महागड्या मद्याचे सेवन आणि अन्नपदार्थांवर ताव मारल्यानंतर तरुणीने तेथून पलायन केले. यावेळी ३९ हजार २४१ रुपयांचे हॉटेलचे बिल तरुणाकडून जबरदस्तीने वसूल करण्यात आले. तक्रारीनुसार हॉटेल चालक आणि मालक यांचे संगनमत होते. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी छापा टाकून सहा आरोपींना अटक केली. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

SL/ML/SL

5 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *