भिवंडीत एफडीएची कारवाई; सहा लाख रुपये किंमतीची औषधे जप्त

 भिवंडीत एफडीएची कारवाई; सहा लाख रुपये किंमतीची औषधे जप्त

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी येथील मे. गायनोवेदा फेमटेक प्रा. लि. या ठिकाणी छापा टाकुन सहा लाख आठ हजार नऊसे रुपये किंमतीची औषधे जप्त केली.
औषधांच्या लेबलवर औषधे व जादुटोनादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ च्या तरतुदींचे भंग होत असल्याचे आढल्यावर ही औषधे जप्त केली. या संदर्भात पुढील तपास कार्य सुरु असून तो पूर्ण झाल्यावर संबंधिताविरुद्ध कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएने दिली.
शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील
नाशिक महामार्गावरील मे. गायनोवेदा फेमटेक प्रा. लि., ग्लोबल कॉम्प्लेक्स, कुकडे, येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकुन सहा लाख आठ हजार नऊसे रुपये ( ६,०८,९०० ) किंमतीची औषधे जप्त केली.
तसेच या धाडीमध्ये काही आयुर्वेदिक औषधांच्या लेबलवर आवश्यक तरतुदींचा उल्लेख नसल्यामुळे एकूण ३ कोटी ६२ लाख ६० हजार ९०० रुपये किंमतीची औषधे पुढील वितरणा प्रतिबंधित करण्यात आली आहे.

वरील जप्त केलेल्या व प्रतिबंधित केलेल्या औषधांच्या उत्पादाकडे ही पुढील चौकशी करण्यात येत आहे . तपास पूर्ण झाल्यावर संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. या धाडी मध्ये औषधांची जप्ती ठाणे अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांनी केली असुन गुप्तवार्ता विभाग मुंबई मधील औषध निरीक्षक शशिकांत यादव यांचा ही समाविष्ट आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त दादाजी गहाणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहा आयुक्त (गुप्तवार्ता) वि.आर. रवि, सह आयुक्त (कोकण विभाग) नरेंद्र सुपे, सहा आयुक्त (कोकण विभाग) मुकुंद डोंगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
SW/ML/PGB
16 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *