विधानभवनाच्या प्रांगणात भगिनींनी मुख्यमंत्र्याना बांधल्या राख्या

 विधानभवनाच्या प्रांगणात भगिनींनी मुख्यमंत्र्याना बांधल्या राख्या

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना ओवाळणी दिली.

विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यतील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधून घेतलेल्या या निर्णयांबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. आम्ही घेतलेल्या मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा जीआर देखील तातडीने काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याचे लाभ येत्या 1 जुलैपासून माता भगिनींना देण्यात येणार आहे. यानुसार या महिलांना दरमहा पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहून जास्त महिलांना होणार आहे.

त्यासोबत महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे
वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे. या सर्व निर्णयाबद्दल या महिलांनी माझे आभार मानून मला राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शासनाचे आभार मानले. Sisters tied rakhis to the Chief Minister in the premises of Vidhan Bhavan

ML/ML/PGB
29 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *