किल्ले सिंहगड २९ मे २०२५ रोजी बंद राहणार

मुंबई, दि 29
सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदरील अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याबाबत हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला..नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे.
यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे.
सर्व नागरिकांनी सहकार्य करून प्रशासनास मदत करावी.
अशी माहिती
उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग, पुणे यांनी दिली.