एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. २० : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदीतून वडिलांचे नाव आणि त्यांची जात वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील माहिती ॲड. संघमित्रा वडमारे यांनी दिली आहे. एकल मातांना “पूर्ण पालक” म्हणून मान्यता देणे ही कोणतीही दया नसून तो संविधानिक अधिकार आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे. एका १२ वर्षांच्या मुलीने शाळेच्या नोंदींमध्ये तिचे नाव दुरुस्त करण्यासाठी आणि ‘मराठा’च्या ठिकाणी ‘अनुसूचित जाती’ म्हणून जात नोंद करण्यासाठी याचिका दाखल केली. तिच्या याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला.

माध्यमिक शाळा संहितेचा हवाला देत शाळेच्या अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्या मुलीला तिच्या नावात दुरुस्ती करण्यास परवानगी नाकारली होती. शाळेने गेल्या वर्षी मुलीची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या याचिकेवर दीर्घ सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने मुलीला शाळेच्या नोंदींमध्ये तिचे नाव आणि जात बदलण्यास परवानगी दिली. हा निर्णय देतानाच न्यायालयाने केवळ आईने लहानाचे मोठे केलेल्या मुलाला वडिलांच्या नाव, जातीची सक्ती केली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले.

शाळेतील नोंद ही खासगी नोंद नसते. शाळेतील नोंद एक सार्वजनिक दस्तावेज आहे. ती नोंद वर्षानुवर्षे, संस्थांमध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रात मुलाची ओळख सिद्ध करतो, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणातील मुलीची आई एकल पालक आहे. ती नैसर्गिक पालक असल्याचे न्यायालयाने विचारात घेतले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *