‘ओ रोमियो’ चित्रपटात गायक राहुल देशपांडेंची डॅशिंग भूमिका
मुंबई, दि. १३ : लोकप्रिय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा मराठी चित्रपटातील अभिनय तर तुम्ही पाहिलाच असेल. आता ते चक्क बॉलिवुडमध्ये एका डॅशिंग भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी हा खरोखरच एक सुखद धक्का आहे.
शाहीद कपूरचा ‘ओ रोमियो’ अखेर थिएटरमध्ये आला आहे. ‘ओ रोमियो’मध्ये राहुल देशपांडे केवळ पार्श्वगायन करण्यासाठी आलेले नाहीत, तर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि डॅशिंग भूमिका साकारली आहे. राहुल यांनी या सिनेमात ‘इन्स्पेक्टर पाठारे’ ही भूमिका बजावली आहे. नेहमी सुरांमध्ये रमणारे राहुल जेव्हा हातात बंदूक घेऊन खाकी वर्दीत पडद्यावर आले, तेव्हा प्रेक्षकांच्या शिट्ट्या थांबल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यांनी बॉलिवूडची सध्याची नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर केली असून, या दोघांमधील सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
‘ओ रोमियो’मध्ये शाहीद आणि तृप्ती सह रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी यांसारखी दिग्गज कलाकारांची फौज आहे. अशा तगड्या स्टारकास्टमध्ये राहुल देशपांडे यांनी आपला ठसा उमटवला आहे.
SL/ML/SL