जैव इंधनावरील जीएसटी आकारणीत लक्षणीय कपात
नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या GST Council च्या बैठकीत जैव इंधनावरील कराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 18% असलेला जैव इधनावरील कर आता 5% वर आणण्यात आला आहे.
साखर कारखाने पेट्रोलिअम कंपन्याना इथेनॉलचा पुरवठा करतात. सध्या पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. लवकरच एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर ही GST कपात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थित सुधारणा होणार आहे.
पेट्रोलमध्ये जैव-इंधन (इथेनॉल) मिसळण्याचे फायदे
- इथेनॉल उसापासून तयार केले जात असल्याने ते जैव इंधन आहे. त्याउलट पेट्रोल हे जीवाश्मीकरणातून उत्पादित होत असल्याने त्याला जीवाश्म इंधन म्हणतात. निसर्गात कच्चे तेल तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. त्यामुळे ते महाग असते.
- इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वाहनातील संपूर्ण इंधनाचे ज्वलन करण्यास ते मदत करते. अशा प्रकारे इंधनाचा पूरेपूर वापर होत असल्याने मागणी थोडी कमी होते.-
- पेट्रोलची मागणी कमी झाल्याने पर्यायी कच्च्या तेलाचीही आयात कमी होईल.
- इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे कमी होऊ शकते. त्यामुळे इथेनॉल वापराला प्राधान्य दिले जात आहे.
- इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.
SL/KA/SL
19 Dec. 2022