एसटी महामंडळाच्या तोट्यात वर्षभरात लक्षणीय घट

 एसटी महामंडळाच्या तोट्यात वर्षभरात लक्षणीय घट

मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच पंचहात्तरी पार केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचा स्वस्त वाहतूक सेवेसाठी आधार असलेली एसटी मागील काही वर्षांपासून तोट्यात जात असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. त्यातच कर्मचाऱ्यांच्या संपाने महामंडळ हवालदिल झाले होते. मात्र आता एसटी चा तोटा लक्षणीयरित्या कमी झाला असून हळूहळू महामंडळाचे अर्थचक्र पुन्हा मार्गावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील वर्षभरापासून तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचा हा तोटा अगदी दहा कोटी रुपयांवर आला आहे.

एसटी संपानंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आलेल्या एसटी समोर आर्थिक अडचणी कायम होत्या. मागील वर्षभरापासून तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचा हा तोटा अगदी दहा कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. मागील वर्षात एसटी महामंडळाला 4000 कोटींचा तोटा झाला होता. त्याच्या तुलनेत, यंदाच्या मे महिन्यात तोटा हा सरासरी 10 कोटींवर आला असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 4000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा फायद्यात येणार की नाही याची चर्चा जोरदार सुरू होती. एसटी महामंडळाचा चार हजार कोटी रुपये एकीकडे तोटा असताना दुसरीकडे गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. अजित पवार अर्थमंत्री असताना महिना 300 कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. यंदा मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत एका महिन्याचा तोटा हा 10 कोटींवर आला असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के आणि 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना 100 टक्के प्रवासात तिकीटात सवलत दिली. तर महिलांना थेट 50 टक्के एसटी भाड्यात सवलत दिली, त्याचा फायदा होताना दिसत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी म्हटले.

तिकीट सवलत योजनेतून झालेला फायदा

75 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवास या योजनेसाठी सरकारकडून मिळालेली रक्कम 91 कोटी रुपये

महिलांना 50 टक्के तिकीट सवलत योजनेसाठी सरकारने प्रतिपूर्तीसाठी दिलेली रक्कम – 179 कोटी रुपये

65 ते 75 वय असलेल्या नागरिकांना 50 टक्के सवलत योजनेसाठी सरकारने दिलेली रक्कम 26 कोटी रुपये

SL/KA/SL

15 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *