भारत-अमेरिका दरम्यान लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण करार

 भारत-अमेरिका दरम्यान लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण करार

न्यूयॉर्क, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकादौरा दोन्ही देशांमध्ये संरक्षण सामग्री विषयक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. अमेरिकेची GE एअरोस्पेस आणि भारताची हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्यांमध्ये फायटर प्लेनच्या इंजीन निर्मितीचा करार झाला आहे. GE ने याबाबतच्या MOU बद्दल माहिती दिली आहे. GE ने दिलेल्या माहितीनुसार भारत तयार होणाऱ्या या युद्ध विमानांचा वापर भारतीय हवाईदलासाठी केला जाईल. GE ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान झालेला हा करार, ऐतिहासिक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दुसरीकडे, न्यूज एजन्सी ANI ने व्हाइट हाऊसच्या हवाल्याने एका कराराबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपती जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी हे संयुक्त निवेदनात भारताला सशस्त्र ड्रोन विक्री करण्याबाबत घोषणा करणार असल्याचं न्यूज एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यात दुसऱ्या दिवशी एका खासगी डिनरसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. येथे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी यांनी त्यांचे स्वागत केले. या डिनरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे NSA जेक सुलिव्हन देखील उपस्थित होते. रात्रीच्या जेवणात बायडेन यांचा आवडता पास्ता आणि आईस्क्रीमचाही समावेश होता.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना लॅबमध्ये बनवलेला 7.5 कॅरेटचा पर्यावरणपूरक ग्रीन डायमंड भेट दिला. त्याचवेळी, ‘उपनिषदाची 10 तत्त्वे’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसोबतच राष्ट्रपती बायडेन यांना जयपूरच्या कारागिरांनी बनवलेली म्हैसूर चंदनाची खास पेटी भेट देण्यात आली.
SL/KA/SL
22 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *