श्यामची आई’ आता चिनी भाषेत….
मुंबई,दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. अनाम प्रेम” तर्फे रविवारी या अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. रसिका प्रभाकर पावसकर यांनी या पुस्तकाचे अनुवादन केले आहे.
रसिका प्रभाकर पावसकर या चीनच्या हनान प्रोविन्समधील “चंगचौ” (zhengzhou) विद्यापीठात चिनी भाषा शिकवण्याची पदवीशिक्षण घेत आहेत. त्यांनी या भाषेतील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेत हे काम केले आहे.
सानेगुरुजींचे आणि समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून “श्यामची आई” चिनी अनुवादित करण्यात आले आहे.
ML/KA/SL
28 Jan/ 2023