किनवट – माहूर तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान…

नांदेड दि २२– नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. मागील झालेल्या चार ते पाच दिवसांपुर्वी अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे नदीकाठच्या शेतींना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्याखाली गेलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके सडल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अस्मानी संकट उभे झाले आहे.
धरावे तर चावते सोडवे तर पळते अशी परिस्थिती शेतीची झाली असून कधी उसनवारी करत तर कधी कर्ज काढून महागा, मोलाची बियाणे शेतात टाकले. ते ही पीक चांगले आले मात्र मागील झालेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी अतिवृष्टी व ढगफुटी पावसाने थैमान घालत पूर परिस्थिती निर्माण करून शेतकऱ्यांच्या शेतातील होत्याचे नव्हते केले. शेतीला तळ्याचे स्वरूप आल्यामुळे सर्वच पिके पाण्याखाली जाऊन पूर्ण पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे.ML/ML/MS