श्रीरामाच्या मूर्तीसाठी विणले जातेय हातमागावर वस्त्र

पुणे , दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या आणि पुण्यातील हेरिटेज हॅन्डविविंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संयुक्त उपक्रम राबवित’दो धागे श्रीराम के लिए!’ हा वस्त्र विणण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर या कार्यात हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची ईच्छा असून त्यांनी यात भाग घेतला आहे . या अंतर्गत १० ते २२ डिसेंबर दरम्यान राम मूर्तीसाठी नागरिकांना दस्त्र विणण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे. यात अनेकविध, भव्य कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याची माहितीर्थ क्षेत्र स्वामी गोविंद देव गिरी आणि हेरिटेज हैंडलिंग रिवायवल चैरिटेबल ट्रस्ट यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. अनघा घैसास यांनी संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली आहे. १९८५ नंतर अनेक प्रकारे श्रीराम जन्मभूमीच्या कार्यात वेळोवेळी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होणार आहेत.नवा अध्याय म्हणून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी धागे राम के लिए हा अद्भुत अविष्कार पुण्यात साकारला जात आहे. भारतीय समाजातील अनेकविध जाती परप्रातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामरायासाठी वस्त्र विणाया एक राष्ट्रीय उदाहरण जगासमोर ठेवतील. या अंतर्गत १० ते २२ डिसेंबर दरम्यान कार्यक्रमस्थळी भव्य मंडप उभारला जाईल. येथे देशभरातील प्रत्येक राज्यातून हातमाग इथे येईल, इतकेच नाही तर, नेपाळसह इतरही काही देशामधून हातमाग येणार आहेत. काही महानुभावाच्या हस्ते पहिले काही धागे विणले जातील आणि नंतर कोणीही येऊन आपल्या श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे या मागावर विणू शकतील. त्याआधी नागरिकांना ते कसे विणावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.
ML/KA/PGB 5 Aug 2023