रविवारपासून श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवास प्रारंभ…

बीड, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अँड.शरद लोमटे यांनी दिली.
श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात रंगरंगोटी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी , सुविधा योगेश्वरी देऊळ कमिटीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी १० वाजता घटस्थापनेने दसरा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. यानंतर सलग नऊ दिवस भाविकांसाठी दुपारी १ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज संगीत भजन,कीर्तन, प्रर्वचन,संगीत गायन असे विविध उपक्रम आयोजित
करण्यात आले आहेत.
ML/KA/PGB 13 Oct 2023