राजकीय प्रगल्भता आणि राज्याची संस्कृती दाखवा
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात होऊ घातलेल्या दोन पोटनिडणुकीसाठी विरोधकांनी आपली राजकीय प्रगल्भता आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
सर्वच राजकीय पक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे आवाहन करून आपल्या आवाहनाला भाजपाने अंधेरी पोटनवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद दिला तसा आता विरोधकांनी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.Show the political depth and culture of the state
महाराष्ट्राची संस्कृती
एखाद्या निवडणुकीत जेव्हा उमेदवार विजयी होतो तेव्हा त्याला आणि त्याच्या पक्षाला तो कौल असतो असे आपले मानणे आहे, मात्र त्या आमदाराचे दुर्दैवी निधन झाले तर उर्वरित काळ त्याच्याच घरातील अन्य कोणी निवडून यावे ही आपली संस्कृती असावी असे ठाकरे या पत्रात म्हणतात.
निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळाली तर लोकांची सहानुभूती मिळते मात्र तसे नसेल तर ती मिळण्याची शक्यता कमी असते असेही त्यांनी नमूद केले आहे.
येणाऱ्या या कसबा आणि चिंचवड च्या पोटनिडणुकीसाठी उमेदवार न देता विरोधकांनी आपली राजकीय प्रगल्भता आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
ML/KA/PGB
5 Feb. 2023