अस्वच्छ शौचालये दाखवा आणि जिंका हजार रुपये

मुंबई, दि. १४ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘स्वच्छता अभियाना’अंतर्गत एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. या प्रवासात टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय आढळले, तर त्याची तक्रार करा आणि लगेच तुमच्या FASTag खात्यावर 1,000 रुपये मिळवा. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोल प्लाझावर असलेल्या अस्वच्छ शौचालयांची तक्रार केल्यास, त्यांना बक्षीस म्हणून 1,000 रुपये FASTag रिचार्ज मिळणार आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू असणार आहे.
NHAI च्या या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया
‘राजमार्गयात्री’ (Rajmargyatra) ॲपचा वापर: महामार्ग वापरकर्त्यांना ‘राजमार्गयात्री’ ॲपच्या लेटेस्ट व्हर्जनवर तक्रार नोंदवावी लागेल.
जिओ-टॅग केलेले फोटो अपलोड: अस्वच्छ शौचालयाचे जिओ-टॅग केलेले (geo-tagged) आणि वेळेची नोंद असलेले (time-stamped) स्पष्ट फोटो ॲपवर अपलोड करावे लागतील.
माहिती भरणे: तक्रार करताना आपले नाव (User Name), स्थळ (Location), वाहन नोंदणी क्रमांक (VRN) आणि मोबाइल क्रमांक (Mobile Number) ही माहिती भरणे आवश्यक आहे.
योजनेच्या महत्त्वाच्या अटी आणि नियम:
प्रत्येक यशस्वी आणि वैध तक्रारीसाठी, संबंधित VRN ला 1,000 रुपये FASTag रिचार्जच्या रूपात बक्षीस दिले जाईल.
हे बक्षीस हस्तांतरणीय नसेल आणि रोख स्वरूपात (cash) दिले जाणार नाही.
प्रत्येक वाहन नोंदणी क्रमांक (VRN) या कालावधीत फक्त एकदाच या बक्षिसासाठी पात्र ठरेल.
ही योजना केवळ NHAI च्या अधिकार क्षेत्राखाली बांधलेल्या, चालवलेल्या किंवा देखरेख केलेल्या शौचालयांसाठी लागू आहे. रिटेल इंधन पंप, ढाबे किंवा NHAI च्या नियंत्रणाबाहेरील सुविधांमधील शौचालयांसाठी ही योजना नाही.
एका दिवसात एकाच ठिकाणी असलेल्या शौचालयाच्या कितीही तक्रारी आल्या तरी, त्या जागेसाठी दिवसातून फक्त एकदाच बक्षीस दिले जाईल.
एकाच शौचालयासाठी एकाच दिवशी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यास, ‘राजमार्गयात्री’ ॲपद्वारे नोंदवलेला पहिला वैध (Valid) फोटोच बक्षिसासाठी विचारात घेतला जाईल.
जमा केलेल्या तक्रारींचे Artificial Intelligence (AI) – Assisted Screening आणि आवश्यकतेनुसार मॅन्युअल व्हॅलिडेशन केले जाईल. कोणतीही फेरफार केलेली, डुप्लिकेट किंवा पूर्वी रिपोर्ट केलेली छायाचित्रे त्वरित नाकारली जातील.
SL/ML/SL 14 Oct. 2025