अपार कार्ड दाखवा, विमान प्रवासात सूट मिळवा
मुंबई, दि. २५ : अपार कार्डधारक विद्यार्थ्यांना विमान तिकीटात मोठी सवलत मिळणार आहे. देशभरात सध्या 31.56 कोटी विद्यार्थांच्ये अपार कार्ड तयार झाले आहेत. आतापर्यं अपार कार्डच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनीना रेल्वे, बस, ग्रंथालयात सवलत मिळत होती. सरकारी योजनांध्ये अनेक सुविधा देण्यात येत होत्या. आता विमान सेवा पण यामध्ये समाविष्ट करण्या येईल. सर्व एअरलाईन्सशी त्यासंबंधीची बोलणी सुरु आहे. अधिकाधिक अपार कार्ड तयार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी अपार कार्ड दाखवून विमान प्रवासात सवलत मिळवू शकतील.
‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या महत्वाकांक्षी योजनेतंर्गत आधार कार्डप्रमाणेच Apaar Card हे देशातील विद्यार्थ्याची नवीन ओळख असेल. हा 12 अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांची शैक्षणिकच नाही तर कौशल्य, खेळातील प्राविण्य याची संपूर्ण माहिती नोंदवले. मुलांच्या करिअरसाठी, नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे. सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इंत्यभूत डाटा असेल. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल.
SL/ML/SL