सरकारी शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून करा स्वस्तात खरेदी

 सरकारी शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून करा स्वस्तात खरेदी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ हे दोन्ही सेल सुरु झाले आहेत.मात्र या खासगी इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मस पेक्षा स्वस्त दरात वस्तू मिळणारी Gem हे भारत सरकारचे पोर्टल तुम्हाला माहित आहे का? या सरकारी वेबसाईटने सर्वात स्वस्त सामान विकून अमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही आता जोरदार टक्कर दिली आहे.

२०२१-२२ मध्ये झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, इतर ई-कॉमर्स वेबसाइटच्या तुलनेत सरकारी Gem पोर्टलवर स्वस्त दरात १० उत्पादने उपलब्ध करून दिली जात आहेत. या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. ज्या उत्पादनांची किंमत कमी आहे, त्यांची गुणवत्ताही मजबूत राहते. सर्वेक्षणात उघड झालेल्या १० उत्पादनांच्या किमती इतर वेबसाइटवर ९.५ टक्क्यांनी जास्त आहेत. अशा स्थितीत जर ग्राहकांनी Gem या सरकारी वेबसाइटवरुन वस्तूंची खरेदी केली तर त्यांची पैशांची मोठी बचतही होऊ शकते.

Gem नावाचे एक सरकारी ऑनलाइन मार्केट प्लेस आहे जे अतिशय वाजवी दरात उत्पादने विकण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक चांगल्या दर्जाची उत्पादने खरेदी करू शकतात. या सरकारी वेबसाइटवर तुम्हाला उत्पादनांची दीर्घ श्रेणी मिळते. वेबसाइटवर ऑफर केलेल्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता जबरदस्त आहे, कारण या वेबसाइटवर उत्पादनाच्या गुणवत्तेवर खूप भर दिला जातो, असे अनेक मिडिया रिपोर्टसमधून दावा करण्यात आलाय.

SL/KA/SL

22 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *