महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची धक्कादायक घटना

 महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची धक्कादायक घटना

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साताऱ्यातील पाटणमधील सोनवडे या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने सोनावडे या सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. यावेळी त्या महिलेने त्रास होतोय हे सांगत असतानाही डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयीपणे अनेक तास त्यांचे ऑपरेशन केले. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. पण डॉक्टरांनी सलाईनमधून पेनकिलर देऊन त्यांना डिस्चार्ज दिला. यानंतर पुन्हा हाच प्रकार घडला.

यानंतर त्यांना पाटणमध्ये त्यांना सोनोग्राफीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांचे पोट फुगले होते. त्यावेळी कराड येथील कॉटेज कुटीर रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्यांनीही केवळ पेनकिलर दिले. आता त्यांना कशाचाच फरक पडत नव्हता. असह्य वेदना होत होत्या. त्यांचं ऑक्सिजन लेव्हलही कमी झाले होते. यानंतर त्यांनी साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण हे कुणीही सोनोग्राफी करत नसल्याचे समजताच कुटुंबाने एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले.

या घटनेनंतर सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते त्या रुग्णालयाविरोधात उपोषण करत आहेत. यानंतर सोनावडे या सरकारी रुग्णालयातून एका व्यक्तीचे निलंबन करण्यात आले. तर इतर दोन जणांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून आरोपींना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच या महिलेवर मोठ्या रुग्णालयात उपचार करुन तिचा जीव वाचवावा. तसेच पीडित कुटुंबंला शासकीय 25 लाख रुपये शासकीय मदत द्यावी, अशीही मागणी केली जात आहे.

Shocking incident of wrongly performed family planning surgery on a woman

ML/ML/PGB
6 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *