शिवसेना वरळी विधानसभेचा वर्धापन दिन 27 जुलैला जल्लोषात होणार

मुंबई प्रतिनिधी शिवसेना वरळी विधानसभेचा वर्धापन दिन सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई 400025 येथे शिवसेना विधानसभा प्रमुख दत्तनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात होणार आहे. या कार्यक्रमात वरळी विधानसभेची स्मरणिका प्रकाशन, अपंग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप, डायलेसीस रुग्णांना वैद्यकीय मदत, ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तसेच औषधाची मदत करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी विभागातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोक आपण करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारसा संस्कृतीचा या मराठी आर्केस्ट्राचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्धापन दिनाला शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.तरी विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या वर्धापन दिनाला उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख रत्ना महाले आणि कार्यक्रमाचे निमंत्रक, विधानसभा समन्वयक प्रशांत गवस यांनी केले आहे.