शिवसेनेच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग क्र.१ च्या महिला विभागसंघटक सौ. शुभदा शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी आरोग्य शिबीर, गर्भाशय चाचणी शिबीर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाखा क्र.१२ मागाठाणे येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिव आरोग्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, विधानसभा समन्वयक तुकाराम पालव, उपविधानसभा समन्वयक सौ सारिका झोरे, शाखा संघटक सौ गायत्री शाह, शाखा समन्वयक सौ इतिश्री महाडिक, सौ निता नाईक, सौ सीमा सानप आदी मान्यवर उपस्थित होते.