शिवसेना उबाठामध्ये प्रवेशानंतर राजन तेली यांचे सिंधुदुर्गात स्वागत

 शिवसेना उबाठामध्ये प्रवेशानंतर राजन तेली यांचे सिंधुदुर्गात स्वागत

सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंधुदुर्ग भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपाला सोडचिट्टी देत काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये मुंबई येथे प्रवेश केला. आज सिंधुदुर्ग मध्ये राजन तेली दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तसेच शिवसैनिकांनी बांदा येथे त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना राजन तेली यांनी राणे कुटुंबीयांवर बोलण्याचे टाळत पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.

सर्वांना बरोबर घेऊन मी पुढे चालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अर्चना घारे नाराज असतील तर त्यांची समजूत घातली जाईल. तसेच माझ्याबरोबर भाजप चे किती लोक असतील ते लवकरच समजेल. असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला. आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेत दीपक केसरकर यांचा पराभव करणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

PGB/ML/PGB
19 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *