शिवसेना ठाकरे गटाच्या या नेत्याला पोलिसांनी केली अटक

नाशिक दि १५– उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले असून अद्वय हिरे यांच्यावर शिक्षक भरती आणि सूतगिरणी प्रकरणी मालेगावात गुन्हे दाखल होते
अद्वय हिरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांवरही शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होता. यासोबतच सूतगिरणीचे कर्जफेड न झाल्याने ही गुन्हा दाखल झाला होता. अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने ते फरार झाले होते.
आज मध्यप्रदेश मधील भोपाळ येथून अद्वय हिरे यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात आल्यानं राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होता . रेणुका सूतगिरणीसाठी NDCC बँकेकडून साडेसात कोटीचे कर्ज त्यांनी घेतले होते, ते न फेडल्यानेही गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती, हायकोर्टाने जामीन नाकारताच
पोलिसांनी त्यांना भोपाळहून आज ताब्यात घेतले.
ML/KA/PGB 15 Nov 2023