सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होता ना ,मग कुठे गेली होती नैतिकता

 सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होता ना ,मग कुठे गेली होती नैतिकता

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उध्दव ठाकरे यांनी नैतिकेतेच्या गोष्टी करू नये. माणूस कसा दुटप्पी असू शकतो, हे या निकालावरून दिसून येते .नैतिकतेच्या दृष्टीकोनातून २०१९ मध्ये युती म्हणून निवडणूक लढलो तेव्हा नैतिकता कुठे होती असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. सर्वसामान्य शिवेसैनिकाला ते मुख्यमंत्री करणार होते तेव्हा कुठे गेली होती नैतिकता. ही जनतेसोबत गद्दारी नाही का. प्रतारणा नाही का असे सवालही खासदार शिंदे उपस्थित केले आहेत, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठाकरे गटाने केलेल्या एकूण सहा विनंत्या सुप्रिम कोर्टाने रद्द केल्या आहेत. विधानसभाअध्यक्ष अपात्र आहे असे म्हणणे सुप्रिम कोर्टाचा अवमान आहे. आम्ही हवेत बोलणार नाही ,वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवणार आहोत असे शिंदे यावेळी म्हणाले.उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री हे पद रिक्त झाले होते.
राज्यपालांनी त्यानंतर सरकार स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले असेही खा शिंदे म्हणाले.
विधानसभेचे अध्यक्ष हेच अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी सक्षम यंत्रणा आहेत. सुप्रिम कोर्टापेक्षा ही लोकं मोठे झाली आहे. राज्यपाल बरखास्त करा अशी मागणी योग्य नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पदाभार देण्याची मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. कारण उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत.जरी मतदान झाले असते तरी त्यांच्याकडे बहुमत नव्हे, विश्वासदर्शक ठराव आला असता तरी ते हरले असते.

लोकांना आमच्या पक्षात यायचे आहे. परंतु ते थांबवण्यासाठी आमचे सरकार येईल असा आव आता आणला जात आहे. आपल्या बाजून सहानुभूती मिळाली पाहीजे यासाठी हा प्रयत्न असल्याचे खा शिंदे म्हणाले.

नैतिकता नसलेले धडे देत आहेत

ज्यांना नैतिकता नाही ते नैतिकेतेचा धडा देत आहेत. हा सगळा दुटप्पी पणा सुरू आहे, आता बारसु चे प्रकरण पहा. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही आणि सुप्रिम कोर्टात मला मुख्यमंत्री व्हायचे सांगितले जात आहे अशी टीका यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. कालच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आमदार, खासदार विचलित झाले आहेत. सुप्रिम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो बदलण्याचे धाडस काहीजण करत आहेत असे ते म्हणाले.

तीन महिन्याच्या आत सुप्रिम कोर्ट निकाल देणार आहे. असे संजय राऊत म्हणत आहे. नरेटीव्ह सेट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. सुप्रिम कोर्टाचा निकाल आपल्याबाजून लागेल म्हणून लोकांना सांभाळून ठेवले.
कालच्या निकालाने हे लोकं कालबाह्य झाले आहेत.
सुप्रिम कोर्टाचा हा अवमान आहे असेही सामंत यावेळी म्हणाले.

ML/KA/PGB 12 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *