माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन…
गोंदिया दि २०: महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री, माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. महादेवराव शिवणकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
माजी मंत्री महादेवराव शिवणकर हे आमदार विधानसभेचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1978,1980,1985,1995,1999
1995 ते 1997 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळ मध्ये जल संपदा मंत्री..
1997 ते 1999 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळामध्ये वित्तमंत्री….
2004 ते 2009 मध्ये चिमूर लोकसभेचे खासदार. ML/ML/MS