राजकोटवर नव्याने उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण….

सिंधुदुर्ग दि ११– जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिभव्य पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. जमिनीपासून 91 फूट उंचीचा हा अतिभव्य असा पुतळा विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातील सर्वात उंच असा हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच उभारण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर आमदार रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या पुतळ्याशेजारील जमीन अधिग्रहित करून त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीने शिवसृष्टी उभारण्यात येईल असे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
ML/MS