मुंबईत छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा निश्चितच
नागपूर दि ९ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यामध्ये स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा दिली. या संदर्भातील मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता. जुन्या आराखड्यानुसार त्यात पुतळा उभारण्याची तरतूद नव्हती त्यामुळेच रेल्वे राज्यमंत्री यांनी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात दिलेल्या उत्तरात पुतळ्याबद्दल माहिती दिली नाही, मात्र नवीन आराखड्यामध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे हा पुतळा उभारला जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याआधी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून भास्कर जाधव यांनी हा मुद्दा विधासभेत उपस्थित केला होता. खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावरती रेल्वे राज्य मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात असा पुतळा उभारण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे म्हटले होते. याबाबत राज्य सरकारने खुलासा करावा अशी मागणी जाधव यांनी यावेळी केली होती. याआधी मुख्यमंत्र्यांनी असा पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन सभागृहातच दिलं होतं असं भास्कर जाधव म्हणाले होते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला.ML/ML/MS