ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच

 ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच

ती वाघनखे शिवाजी महाराजांची च

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहातून राज्य शासनाने मागवली वाघनखे ही छञपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असे आज ठामपणें सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. या निवेदनसोबत त्यांनी काही फोटो आणि वर्तमानपत्रांची कत्रणेही प्रसिद्धी मध्यामांसाठी उपलब्ध करून दिली आहेत

ही वाघनखे लंडन च्या वस्तुसंग्रहालयातून मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला. जे पुरावे आम्हाला देण्यात आले त्यानुसार ती व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून मिळवण्याचा प्रयत्न शासनाने केला. या वाघ नखांबद्दल हजारो इतिहास संशोधकांपैकी केवळ एकाने शंका उपस्थित केली आहे असे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही नखे शिवाजी महाराजांची नाहीत असे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

आज विधानसभेत भाजपाच्या रणजीत सावरकर यांनी याबाबत खुलासा होण्याची मागणी केली होती, त्यानंतर मुनगंटीवार यांनी निवेदन करीत हा खुलासा केला. ही वाघनखे आणण्यासाठी कोणतेही भाडे दिलेले नाही , आतापर्यंत ही वाघनखे जिथे ठेवण्यात येणार आहेत तिथल्या वस्तू संग्रहालये , इतर शस्त्रे यावर काही रक्कम खर्च झाली आहे . लंडन येथून ही वाघनखे आणण्यासाठी चौदा लाख खर्च झाला आहे, ही वाघ नखे शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत असे लंडनच्या वस्तू संग्रहालय यांनी ज्या पेटीत ही वाघनखे ठेवली आहेत त्यावरील मजकुरा नुसार हे स्पष्ट होते असे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. Shivaji Maharaj

ML/ML/PGB
11 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *