खालीद का शिवाजी या चित्रपटास शिवप्रेमींचा विरोध कारवाई ची केली मागणी

ठाणे : ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या चित्रपटांला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आले. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान सैनिक होते, त्यांच्या अंगरक्षकापैकी 11 मुसलमान अंगरक्षक होते आणि महाराजांनी रायगड किल्ल्यावर मुसलमान सैनिकास साठी मस्जिद सुद्धा बांधली होती, शिवाय शीर्षकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे जर हा चित्रपट प्रसारित करण्यात आला तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक धोका निर्माण होऊ शकतो याअनुषंगाने आपण सर्व चित्रपट गृहाच्या मालकांना हा चित्रपट न प्रसारीत करण्याच्या सूचना देण्यात याव्यात तसेच या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, दिग्दर्शक, प्रसार माध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड करण्यात सामील असलेल्या सर्व जुरी, अधिकारी, मंत्री तसेच अन्य संबंधितावर अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळावर अपप्रचार करणे याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी याबाबत या निवेदनात मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व चित्रपट प्रसारित होऊ न देण्यासाठी योग्य ती पावले उचलू असे सांगण्यात आले. सदर प्रसंगी शिवशंभू विचार मंचचे ऍड अनमोल जाधव , शिव संस्कृती प्रतिष्ठान ठाणेचे दत्ता घाडगे, शिवराज मंचचे भूषण साटम, शिवराज्याभिषेक समारोह समितीचे शंतनू खेडकर , शिवस्वराज संस्थेचे सुनील नरे व संतोष भोईर आदी शिवप्रेमी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.AG/ML/MS