शिवराज्याभिषेक सोहळा, जलाभिषेक, सुवर्णाभिषेक…

 शिवराज्याभिषेक सोहळा, जलाभिषेक, सुवर्णाभिषेक…

महाड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड मधील दुर्गराज रायगड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आज तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड तसेच कोकण कडा मित्र मंडळ, यांचे संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती दर्शविली. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार,आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक आणि सुवर्णाभिषेक करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील मानवंदना दिली. याप्रसंगी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवभक्तांतर्फे पालखी मिरवणूक काढण्यात आली. रायगड किल्ला तसेच परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना सोई सुविधा निर्माण करताना आवश्यक काळजी घेण्यात आली होती.

वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध व्यवस्था करताना सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्यात आली होती. तसेच खासगी वाहनांच्या पार्किंग ठिकाणापासून देखील बससेवा उपलब्ध होती.

ML/ML/SL
20 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *