काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे शिवसेनेचा बहिष्कार ..?
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राहुल गांधी यांना इशारा दिल्यानंतर आज संसदेतील ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचे समजते आहे.
मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले होते, त्यानंतर दैनिक सामना मधूनही राहुल गांधी यांना उपदेशाचे डोस पाजण्यात आले होते.
आज सायंकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांची बैठक आणि भोजन समारंभ आयोजित केला आहे, त्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतल्याचे वृत्त आहे, याबाबत कोणताही अधिकृत निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही मात्र ही अनुपस्थिती विरोधी पक्षाच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
ML/KA/SL
27 March 2023