शिवसेनेच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला प्रारंभ

बुलडाणा, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघटना बांधणी आणि जनतेची संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या ( उबाठा ) वतीने मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा काढण्यात येत आहे . 30 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळापासून या यात्रेला आज सुरुवात झाली. शिवसेना( उबाठा ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
राजवाडा परिसरातच त्यांची पहिली जाहीर सभा झाली, त्यानंतर पुढील प्रवासासाठी जनतेच्या सोबत पायी मार्गस्थ झाल्या. ही यात्रा 35 दिवसाची असून अकरा लोकसभा मतदारसंघ आणि 35 विधानसभा मतदारसंघातुन जाणार आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे झाला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन लोकांशी संवाद साधणार आहेत.
ML/KA/SL
31 Jan. 2024